किल्ला कसा पहाल- किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे. पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून कांही अंतरावर बांधलेली तटबंदी. मुख्य दरवाजाला संरक्षण देणार्या निबीच्या दरवाजापुढे गेल्यावर 30 मिटर उंचीची तटबंदी. मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा होता, त्यास दिंडी दरवाजा म्हणत. रात्रौ मुख्य दरवाजा न उघडता त्याचा जाण्या-येण्यासाठी उपयोग करीत. डाव्या बाजूला खलबतखाना नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये सभा बैठका होत. या इमारतीचच्या समोर दारु-गोळ्याचे कोठार आहे. पुढे गेल्यावर भुयार दिसते. भुयाराच्या बाजूने तटावर जाण्यासाठी पायर्या आहेत. या किल्ल्यास विविध नावाचे 18 बुरूज आहेत. तटावरुन चालतांना बारकाईने पाहिल्यास तटाखालील कोठारे दिसून येतात. कांही अंतर चालून गेल्यावर लाईट हाऊस दिसते. लाईट हाऊसच्या पुढे तटाच्याखाली चुन्याचा घाणा दिसतो. तटाते बांधकाम करतांना दगडामध्ये सांधण्यासाठी वापरावयाचे सिमेंट मिश्रण म्हणून चुना, रेती, गुळ, हरड्याचे पाणी व नारळाचा काथा या घाण्यामध्ये मिश्रण करुन सिमेंट बनवत. चुन्याचा घाण्याच्या बाजूला गोड्या पाण्याच्या विहिरी, साहेबाचे ओटे, भवानी मातेचे मंदिर, जुने रेस्ट हाऊस, जखीणीची तोफ यासारख्या गोष्टी येथे पहावयास मिळतात
आठशे वर्षांचा इतिहास - 'किल्ले विजयदुर्ग'

लोड होत आहे...