Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

रंगराव चौधरी

मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस असून विनोदी चित्रपटांबरोबरच राजकारणावर चित्रपट येऊ लागले आहेत. संजय नावेर्कर यांच्या अभिनयाने नटलेल्या 'रंगराव चौधरी' या चित्रपटाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा राजकारणावरील चित्रपटाला 'हाऊसफुल्ल'चा फलक पाहायला मिळत आहे.

रामदास भोसले निमिर्त आणि अजित शिरोळे दिग्दशिर्त या चित्रपटात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कांद्याचे कडाडणारे भाव याविषयांपासून ते सामान्य माणसात दडलेला सुप्त मुख्यमंत्री प्रत्यक्ष अवतरला तर काय होईल, याचे दर्शन घडवण्यात आले आहे.

रंगा नावाच्या स्वप्नाळू वृत्तीचा तरुण आघाडीचे अभिनेते नावेर्कर यांनी उत्कृष्ठ पद्धतीने साकार केला आहे. हा तरुण सरपंच, जिल्हा परिषद सदस्यापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत कसा पोहोचतो आणि सामान्य माणसात उमीर् कशी चेतवतो, याचे चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे. नावेर्कर यांच्यासह अनंत जोश, जयराम कुलकणीर्, विजय चव्हाण, रवींद बेडेर् आणि उषा नाईक या ज्येष्ठ कलावंतांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांवर छाप पाडतो. आमदार पोपटराव गावडे यांनीही यामध्ये भूमिका केली आहे. सुरेश वाडकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले आणि उत्तरा केळकर यांनी गीते गायली आहेत. राहूल घोरपडे यांनी संगीत दिले आहे.
नकार