Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

रविवारी युवा राष्ट्रकुल स्पर्धेचे उद्घाटन

तिस-या युवा राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उद्या रविवारी बालेवाडीतील क्रीडानगरीत रंगणार आहे. बीजिंग ऑलिम्पिंकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नेमबाज अभिनव बिंद्राबरोबरच कुस्ती आणि बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ब्राँझपदकं मिळवणारे सुशीलकुमार आणि विजेंदरकुमार या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असतील.

युवा राष्ट्रकुल स्पधेर्चे उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. कॉमनवेल्थ फेडरेशनचे अध्यक्ष मायकेल फेनेल कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. याखेरीज राष्ट्रकुल स्पधेर्च्या ग्रीन कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शशी थरूर, केंदीय क्रीडामंत्री एम. एस. गिल, केंदीय नागरी विकासमंत्री जयपाल रेड्डी, केंदीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचीही सोहळ्याला उपस्थिती असेल. बॉलिवूडमधील तारेतारकांसह सानिया मिर्झा, पी. टी. उषा, धनराज पिल्ले, अजंली भागवत यांची हजेरीही लक्षवेधून घेईल.
नकार