Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

नसीरुद्दीन शहा यांना 'झेनिथ एशिया' पुरस्कार

प्रायोगिक रंगभूमी, समांतर सिनेमा आणि व्यावसायिक हिंदी चित्रपटांतून समर्थ अभिनयाचे दर्शन घडवणाऱ्या नसीरउद्दीन शहा यांना एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देण्यात येणारा 'झेनिथ एशिया' पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार, वीरेंद चित्राव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन १६ ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ६.३० वाजता सिटीप्राईड (कोथरूड) येथे इंदिरा ग्रुपच्या संस्थापक तरिता महेंदळे यांच्याहस्ते होईल. या प्रसंगी सोमरत्न दिसायके यांचा 'किंग सीरी' हा श्रीलंकेचा चित्रपट दाखवण्यात येईल असे जकातदार यांनी सांगितले. महोत्सवात नसीरउद्दीन शहा यांचे 'निशांत', 'आक्रोश', 'वेन्सडे' हे चित्रपट दाखवण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. दरवषीर्प्रमाणे महोत्सवाचा समारोपाचा चित्रपट मराठी असणार आहे. 'ब्र' या गाजलेल्या कादंबरीवर आधारित 'बाईमाणूस' हा चित्रपट समारोपाच्या दिवशी २३ ऑक्टोबरला दाखवण्यात येणार आहे. याच दिवशी टाईड हॅन्डस्, महक या चित्रपटाचा भारतातील पहिला शो अणि झेंडा मराठीचा हा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नकार