Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

ऐश्वर्या गायिका बनण्याच्या तयारीत

बच्चन कुटुंबाला बहुधा लोकांना धक्के द्यायला आवडत असावं. अमिताभने अक्स, ब्लॅक, भूतनाथ, द लास्ट लिअर सारखे सिनेमे केले सिनेप्रमींना चकीत केले. तर अभिषेकने गुरू आणि द्रोणा मधून थोडी हटके भूमिका करुन पाहिली. आता त्यापेक्षा वेगळा प्रयोग ऐश्वर्याने करायचा ठरवला आहे. अभिनयामध्ये ती ग्रेट आहेच पण आता गायनाच्या क्षेत्रात ती स्वतःला आजमावून पाहतेय.

आता हे सगळ वाचल्यावर अॅश प्ले बॅक सिंगर बनणार आणि आगामी सिनेमात एखादे गाणे गाणार असच कोणालाही वाटेल. पण तस मुळीच नाही. ऐश्वर्या चक्क शास्त्रीय गायन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तिनं रियाज सुरू केला आहे. फॅनपुढे जायचं ते बॉलिवूड स्टार आणि शास्त्रीय गायिका अशी ओळख घेऊनच असा इरादा पक्का केलेली अॅश शास्त्रीय गायिका होण्यासाठी खूप मेहनत करत आहे.

पण हा रियाज केल्यानंतर करिअरमध्ये तिच्या एकदम ट्विस्ट येईल असं म्हणणं धाडसाच ठरेल. कारण हा सगळा खटाटोप निव्वळ मणिरत्नमसाठी सुरू आहे. मणिरत्नमने तिला ' रावण ' या आगामी सिनेमात शास्त्रीय गायिकेची भूमिका दिली आहे. ही भूमिका व्यवस्थित पार पाडायची म्हणजे शास्त्रीय गायन समजून घेतलच पाहिजे. त्यात मणिरत्नमचा सिनेमा म्हणजे एवढीशी चूक पण चालणार नाही. त्यामुळेच ही तयारी सुरू आहे.
नकार