Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

सचिनला हव्यात फक्त ७७ धावा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा ब्रायन लाराचा विश्वविक्रम मोडण्यासाठी आणखी फक्त ७७ धावा हव्या आहेत. त्यापैकी ७६ धावा करताच तो लाराच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल.

क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या लाराने टेस्ट करिअरमध्ये १३१ मॅच खेळून ११ हजार ९५३ धावा केल्या आहेत. तर सचिनने १५१ मॅच खेळत ११ हजार ८७७ धावा केल्या आहेत.

भारतीय क्रिकेटप्रेमींचा लाडका सचिन १९८९ पासून सतत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळतो आहे. भारताला अनेक महत्त्वाच्या सामन्यात त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर विजय मिळवता आला आहे. प्रदीर्घ टेस्ट करिअरमध्ये ३९ शतके आणि ४९ अर्धशतके झळकावणा-या मास्टर ब्लास्टरकडून क्रिकेटप्रेमींना खूप अपेक्षा आहे. लंकावारीत विक्रमासाठी १७२ धावा हव्या असताना सचिन प्रचंड दडपणाखाली खेळला. तीन टेस्ट मॅचच्या सिरिजमध्ये जेमतेम ९५ धावा करुन त्याने निराश केले. मात्र गावस्कर-बॉर्डर ट्रॉफीत उरलेल्या ७७ धावा सहज काढून तो बॅडपॅचमधून बाहेर येईल असा विश्वास क्रिकेटप्रेमींना वाटतो आहे.

भारतात होत असलेल्या या स्पर्धेत तीन टेस्ट आहेत. मायदेशात सचिनची बॅटिंग अनेकदा प्रभावी राहीले आहे. मात्र गांगुलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असताना आणि अनिल तसेच राहुलवर निवृत्तीसाठी दबाव येत असल्यामुळे सचिन नकळत टेन्शमध्ये चुका करण्याची शक्यता आहे. त्यातच ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिकी पॉटिंगने सचिनवर आमचे बॉलर विशेष लक्ष ठेवणार असल्याचे जाहीर केल्यामुळे विकेट टिकवून विश्वविक्रम करण्याचे मोठे आव्हान सचिनपुढे असेल.

नकार