Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

बॉलीवुडला लागला 'सिंग'चा चस्का

बॉलिवुडपटात केवळ विनोदी व्यक्तिरेखा म्हणून लोकप्रिय असणारे 'पगडीवाले सिंग' आता खरोखरच 'सिंग इज किंग' म्हणण्यास सरसावले आहेत. अक्षयकुमारच्या 'सिंग'ने तिकीटबारीवर चांगली कमाई केल्यावर आता सलमान आणि सैफ हे तगडे स्टारही 'पगडीवाल्या सिंग'च्या रुपात लवकरच पडद्यावर झळकणार आहेत.

आगामी 'हिरो' चित्रपटाचे प्रोमो टीव्हीवर झळकू लागले असून, त्यातील पगडीमधल्या सलमानवर आत्तापासूनच तरुणी फिदा होऊ लागल्या आहेत. या चित्रपटात तो सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी सैफ अली खानही दीपिका पदुकोणसोबत पतियाळात शुटिंगमध्ये बिझी आहे. तोही यात 'पगडीवाला सिंग'च्या भूमिकेत आहे.

चित्रपटातील या प्रमुख भूमिकांचे शीख समुदायाने स्वागत केले आहे. 'चित्रपटातील मुख्य भूमिकेत शीख व्यक्तिरेखा दाखवणं, शीख समुदायासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते दिलीप ढिल्लन यांनी व्यक्त केलेय. तर 'अपवाद वगळता सिंग व्यक्तिरेखेला चांगल्या भूमिकाही मिळाल्या नाहीत. मात्र हा ट्रेन्ड चांगला असल्याचे' सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने चित्रपटातल्या या सकारात्मक बदलाचे स्वागत केले आहे.
नकार