Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

सौरव गांगुलीची निवृत्तीची घोषणा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सिरीजनंतर निवृत्त होण्याची घोषणा भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने आज केली. मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिरीज माझी अखेरची सिरीज असेल, असे गांगुलीने आज जाहीर केले.

ऑस्ट्रेलिया सिरीजनंतर सन्मानाने निवृत्त होण्याच्या अटीवरच गांगुलीचा भारतीय संघात समावेश झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. सौरव गांगुलीच्या आजच्या घोषणेमुळे या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. दरम्यान, याबाबत बीसीसीआयशी गुप्त समझोता झाल्याच्या टीकेचा गांगुलीने मात्र इन्कार केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या ९ ऑक्टोबरपासून सुरु होणारी टेस्ट सिरीज एकदम टफ असेल. कांगारुंच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे गांगुलीने सांगितले. आज बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनीही गांगुलीची भेट घेतली. गांगुलीचा संघात प्रवेश झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती.

भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी गांगुलीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गांगुलीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणतेही दडपण मनावर न ठेवता खेळायचे होते. आजच्या निर्णयामुळे तो खरोखरच दडपणातून मुक्त होईल, अशी आशा त्यांनी बोलून दाखवली.
नकार